मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उडत्या चालीच्या गाण्यांसह आपल्या अतरंगी जीवनशैलीसाठी ख्यात असणारे संगीतकार व गायक भप्पी लाहिरी यांनी आज शेवटचा श्वास घेतला आहे.
ज्येष्ठ संगीतकार तथा गायक भप्पी लाहिरी यांचे आज उपचार सुरू असतांना निधन झाले असून त्यांच्या मृत्यूमुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ६९ वर्षे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी त्यांना डिसचार्ज देखील देण्यात आला होता. मात्र काल त्यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर त्यांनी पहाटे शेवटचा श्वास घेतला.

सत्तर आणि ऐंशीच्या दशकात भप्पी लाहिरी यांनी बॉलिवुडवर अधिराज्य गाजविले, डिस्को डान्सर, शराबी आदींसह अनेक चित्रपटांमधील त्यांचे संगीत गाजले.



