भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील गुन्हेगारीचे निर्दालन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने तीन गुन्हेगारांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले असून यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
भुसावळ शहरातील गुन्हेगारी ही कायम चर्चेत असते. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्याचा पवित्रा घेतल्याने गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे. मध्येंतरी खरात टोळीसह इतरांना हद्दपार करण्यात आलेले असतांना आता पुन्हा नव्याने तीन गुन्हेगारांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.

अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असणार्या शहरातील तिघांच्या हद्दपारीचे प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्याकडे पाठवले आहेत. या प्रस्तावाची पोलिस प्रशासनाकडून चौकशी होऊन ते पुन्हा जिल्हा अधीक्षकांकडे पाठवण्यात येतील. यानंतर यावर निर्णय होणार आहे. दरम्यान, शहरातील अजून काही गुन्हेगारांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.


