Home आरोग्य पाचोरा नगरपरिषदेच्या ९८ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

पाचोरा नगरपरिषदेच्या ९८ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

0
28

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्यास अमरावती येथील महानगर परिषदेच्या आयुक्तांनी ९ फेब्रुवारी रोजी मान्यता दिली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ काही महिलांनी आयुक्तांना घेराव घालून त्यांच्या अंगावर शाई फेकली तर पाचोरा नगरपरिषदच्या ९८ कर्मचाऱ्यांनी दि. १० फेब्रुवारी रोजी दिवसभर लेखणी बंद आंदोलन केले.

पाचोरा नगर परीषदेत एकुण २०४ कर्मचारी असून त्यापैकी आरोग्य विभाग व सफाई कामगार, पाणी पुरवठा विभाग या अत्यावश्यक विभाग वगळता, बांधकाम विभाग, लेखा विभाग, विज पुरवठा विभाग, वसुली विभाग, जन्म मृत्यू नोंदणी विभागासह सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी हे लेखणी बंद आंदोलनात सहभागी झाले होते. यात मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, वसुली विभागाचे प्रमुख साईदास जाधव, सह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.

 


Protected Content

Play sound