Home Cities अमळनेर कलाली शिवारात शार्टसर्कीटमुळे ऊसाला आग; साडेतीन लाखांचे नुकसान

कलाली शिवारात शार्टसर्कीटमुळे ऊसाला आग; साडेतीन लाखांचे नुकसान

0
160


अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील कलाली येथील शेतात इलेक्ट्रीक तारांच्या झालेल्या शार्टसर्कीटमुळे ऊसासह ठिंबक नळ्या जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यात सुमारे साडे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत मारवड पोलीसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, प्रकाश धनसिंग पाटील (वय-५२) रा. कलाली ता. अमळनेर यांचे कलाली शिवारातील गट नंबर ६०/२/अ मध्ये शेत आहे. त्यांनी शेतात ऊसाची लागवड केली होती. शनिवार ५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतातून गेलेल्या महावितरण कंपनीच्या ताराच्या शार्टसर्कीटमुळे ऊसाला आग लागली. या आगीत शेतातील ऊस आणि ठिंबक नळ्या जळून खाक झाले आहे. यात सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले. आग लागताच गावातील पद्माकर दत्तात्रय पाटील यांनी अमळनेर नगरपालिकेचा अग्नीशमन बंब बोलाविला व आग विझविण्यात आली. याप्रकरणी प्रकाश पाटील यांच्या खबरीवरून मारवड पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील करीत आहे.

 


Protected Content

Play sound