पाच लाखासाठी विवाहितेचा छळ; शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घर बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरकडील चार जणांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की,  ज्ञानदेव नगर येथील मोहिनी बेंडाळे  यांचा विवाह जळगाव तालुक्यातील खेडी येथील तुषार ज्ञानदेव बेंडाळे  यांच्यासोबत झाला आहे. लग्नानंतर काही दिवसांनी पतीसह सासरच्यांकडून  विवाहिता मोहिनीने तिच्या माहेरून घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये आणावे अशी मागणी करण्यात आली. याच कारणावरून तिला पतीने मारहाण केली तर सासरच्या मंडळींनी उलट सुलट बोलून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. अशा आशयाच्या  मोहिनी बेंडाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून  तिचे पती तुषार ज्ञानदेव बेंडाळे , सासरे ज्ञानदेव नामदेव बेंडाळे , नणंद कुमुदिनी जगदीश कोल्हे सर्व रा. खेडी ता. जळगाव व दीर प्रवीण ज्ञानदेव बेंडाळे रा. एमआयडीसी  जळगाव या चारजणांविरुध्द शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रकाश युवराज पाटील हे करीत आहेत

Protected Content