Home Cities जळगाव गोदावरी स्कूलमध्ये वसंत पंचमी उत्साहात

गोदावरी स्कूलमध्ये वसंत पंचमी उत्साहात

0
50


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये निसर्गाचा उत्सव असलेली ‘वसंत पंचमी’ साजरी करण्यात आली. यावेळी वसंत पंचमीच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.

गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शनिवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी ‘वसंत पंचमी’ साजरी करण्यात आली. यावेळी स्कूलच्या प्राचार्या नीलिमा चौधरी यांनी सरस्वती प्रतिमा पूजन, विद्येचे साहित्य, संगीत वाद्ययंत्राचे पूजन केले. तसेच ‘वसंत पंचमी’चे महत्व सांगितले.

या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. वसंत म्हणजे आशा व सिद्धी यांचा सुंदर मिलाफ आहे. हे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगून वसंत पंचमीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी सरस्वती वंदन, श्लोक सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.


Protected Content

Play sound