धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बांभोरी येथील एका पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या टपरीत घरगुती गॅसचा रिक्षात भरून काळा बाजार करणाऱ्या एकावर पाळधी पोलीसांनी छापा टाकून ५२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पाळधी दुरक्षेत्र ठाण्यात एकावर करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी शिवारात असलेल्या खुबचंद पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या एका पत्र्याच्या टपरीत घरगुती गॅसचा रिक्षासाठी काळ्याबाजारात विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पाळधी दुरक्षेत्र पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने गुरूवारी ३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता छापा टाकून घरगुती गॅसचे १७ सिलेंडर, इलेक्ट्रीक मोटार, वजन काटा असा एकुण ५२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पाळधी दुरक्षेत्र पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अनिल शंकर सोनवणे (वय-४४) रा. याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा करीत आहे.