सिंधुदुर्ग – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयाने दोन दिवसांची अर्थात ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला असून आपल्यावर हा हल्ला नितेश राणे यांनी केला असल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता.
या प्रकरणी न्यायालयानं नितेश राणेंना याआधीची जामीन अर्ज देणं फेटाळलं होतं. राने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिवाणी न्यायालयात गेल्यानंतर याप्रकरणी युक्तिवाद झाला. आमदार निलेश राणे यांची कणकवली पोलीस स्टेशनमध्ये कसून चौकशी केली जाणार असून त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर ते जामीनासाठी अर्ज करु शकतात.
हा आरोप करण्यात आल्यानंतर नितेश राणे यांनी अनेक दिवस समोर येणं टाळलं. चार वेळा जामीन फेटाळण्यात आलेल्या राणेंना आधी जिल्हा सत्र न्यायालय, हायकोर्ट आणि मग सुप्रीम कोर्टानंही त्यांना जामीनासंदर्भात दिलासा दिला नव्हता. अखेर आता न्यायालयानं नितेश राणेंना पोलीस कोठडी सुनावली असून आता नितेश राणेंना अटक होणार हे निश्चित झालं असून कोर्टाने त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.