अमोल शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यास सुरुवात

*पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या पाठपुराव्याला पुन्हा यश आले आहे.

पाचोरा व भडगाव तालुक्यातील प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन – २०२१ अंतर्गत प्रमुख पिके (कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, इ.) पिकांचे खरीप हंगामात सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या खंड (गॅप) मुळे, तसेच नंतर झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणे बाबत व प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत होणे बाबत जिल्हाधिकारी यांच्या सह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव व प्रांताधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा आणि तहसीलदार पाचोरा, यांना दि. ३० सप्टेंबर २०२१ रोजी निवेदन देण्यात आले. या अनुषंगाने संबंधित विमा कंपनी आय. सी. आय. सी. आय. लोंबबोर्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. यांनी तात्काळ नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अशी आग्रही मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली होती. त्या अनुषंगाने आजपासून प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन – २०२१ अंतर्गत पात्र विमाधारक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात सँपल सर्व्हे व वैयक्तिक नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे अमोल शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे तातडीने रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. पाचोरा व भडगाव तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे सॅम्पल सर्वेनुसार चे नुकसान भरपाई व वैयक्तिक नुकसानीची नुकसान भरपाई अजून पर्यंत जमा झाले नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. या बाबत वेळोवेळी पाठपुरावा व पत्रव्यवहार करून दि. २७ जानेवारी २०२२ पासून *भडगाव तालुक्यातील ५८४ शेतकऱ्यांना १९ लाख २० हजार ५२८ रुपये* तर*पाचोरा तालुक्यातील ३ हजार ८७६ शेतकऱ्यांना १ कोटी ५९ लाख २९ हजार ९०० रुपये प्रमाणे नुकसान भरपाई वितरित होण्यास सुरुवात झाली आहे.* सदरील नुकसान भरपाईची रक्कम सॅम्पल सर्व्हे व वैयक्तिक नुकसान भरपाईपोटी मंजुर झालेले आहेत. नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी अमोल शिंदे यांनी केलेला पाठपुराव्याबद्दल शेतकऱ्यांनी अभिनंदन करीत आभार व्यक्त केले आहे.

Protected Content