Home क्राईम पूर्व वैमनस्यातून भुसावळात एकावर चाकू हल्ला

पूर्व वैमनस्यातून भुसावळात एकावर चाकू हल्ला

0
30

भुसावळ प्रतिनिधी । येथील आयान कॉलनीतील रहिवाशी आशिक बेग असलम बेग (बाबा काल्या ) याच्यावर रात्री २:३० वाजेच्या दरम्यान पूर्व वैमनस्यातून चाकू हल्ला झाल्याची घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की आशिक बेग असलम बेग (बाबा काल्या ) याची एका प्रकरणात नुकतीच जामीनावर मुक्तता झाली आहे. तो घरी असतांना दिनांक २८ एप्रिल रात्री २:३० वाजेच्या दरम्यान तीन ते चार जणांनी जुन्या वादावरून चाकू ने हल्ला केल्याची घटना घडली असून आशिक बेग असलम बेग (बाबा काल्या ) याला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविल्यात आले आहे. पोलीस स्टेशनला बाबा काल्याच्या नातेवाईकांनी येऊन माहिती दिली. बाजारपेठ पोलीस स्टेशनमधील कर्मचारी गोदावरी हॉस्पिटल मध्ये जबाब घेण्यासाठी गेले असता बाबा काल्या जबाब देण्याच्या परिस्थिती नसल्यामुळे घटनेचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound