Home Cities जळगाव जळगावच्या शिवांगी काळेला प्रधानमंत्री बाल शक्ती पुरस्कार

जळगावच्या शिवांगी काळेला प्रधानमंत्री बाल शक्ती पुरस्कार

0
107


जळगाव प्रतिनिधी | आपल्या आईला विजेचा धक्का लागला असतांना प्रसंगावधान राखून तिचे प्राण वाचविणार्‍या जळगाव येथील शिवांगी काळे या चिमुकललीला आज प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देशातील बाल शौर्य विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोरोनाच्या आपत्तीमुळे हा कार्यक्रम ऑनलाईन या प्रकारात घेण्यात आला. यात जळगाव येथील शिवांगी काळे या साडेसहा वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे.

शिवांगीने तिच्या आईचे प्राण वाचविले. की घटना ५ जानेवारी २०२१ रोजी घडली. तिची आई घरात बाथरूममध्ये असतांना त्यांना विजेच्या हिटरचा शॉक लागला. यामुळे त्यांच्या तोंडून किंचाळी बाहेर पडले. बाथरूमच्या बाहेर तेव्हा पाच वर्षाची असणारी शिवांगी ही दोन वर्षाच्या आपल्या बहिणीसह होती. या दोन्ही बहिणी आईची अवस्था पाहून घाबरल्या. मात्र शिवांगीने प्रसंगावधान राखून आईला स्पर्श न करता हिटरचे स्वीच बंद केले. यातून तिने आईचे प्राण तर वाचवलेच. पण ती आणि तिच्या बहिणीलादेखील दुर्घटनेपासून वाचविले. यामुळे आज तिला प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह शिवांगी आणि तिच्या पालकांनी पंतप्रधानांशी संवाद साधला. या कार्यक्रमात तिला गौरविण्यात आले. या माध्यमातून जिल्ह्याचा नावलौकीक उंचावला आहे.


Protected Content

Play sound