ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी गावांची जिल्हा स्तरीय समितीने केली पाहणी

चाळीसगाव, प्रतिनिधी | संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या स्पर्धेत तालुक्यातील सात गावांनी सहभाग नोंदविला आहे. या गावाला जिल्हा स्तरीय समितीने नुकतीच भेट देऊन पाहणी केली.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत स्पर्धा राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत तालुक्यातील देवळी, लोंढे, बहाळ, मांदुर्णे, सांगवी, भोरस व भांबरे या सात गावांनी सहभाग घेतला आहे. यात जिल्हा परिषदेच्या सात गणांची निवड पंचायत समिती स्तरावर निवड करण्यात आली आहे. तत्पूर्वी अभियानात सहभागी झालेल्या गावांना नुकतीच जिल्हा स्तरीय समितीने भेट देऊन पाहणी केली. यावेळी सार्वजनिक शौचालय, अंगणवाडी, आरोग्य केंद्र व परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली. याप्रसंगी जिल्हा परिषद विस्तार अधिकारी निळकंठ ढाके, समाजशास्त्रज्ञ जिल्हा परिषद भिमराव सुरदास, गट समन्वयक प्रदिप साळुंखे, समुह समन्वयक हेमंत मांडोळे, सहायक गटविकास अधिकारी के.एन.माळी व ग्रामविकास अधिकारी शिर्के आदी उपस्थित होते.

Protected Content