रावेर प्रतिनिधी | रावेर येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन जनार्दन महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले.
‘सर्व आजारांवरील उपचार तालुक्यात उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठ्या संख्येने बाहेरगावी जावे लागते. परंतु रावेर शहरात नव्याने सुरु झालेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे रुग्णाची धावपळ कमी होईल व त्यांच्या सर्व आजारांवर उपचार उपलब्ध होणार असल्या’चे प्रतिपादन महामंडलेश्वर श्री.जनार्दनजी महाराज यांनी उदघाटनप्रसंगी केले.
रावेर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून या ठिकाणी या हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा पुरवली जाणार आहे. यावेळी नवजीवन हॉस्पिटलचे संचालक अमोल महाजन, निलेश महाजन तसेच ज्यांच्या संकल्पनेतून हे हॉस्पिटल साकारले गेले आहे ते ऑल इज वेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ सुबोध बोरोले (ऑर्थो) यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प.पु. महामंडलेश्वर श्री.जनार्दनजी हरी महाराज, पपू. महंत १००८ श्री. जानकीदासजी महाराज, पद्माकर महाजन, रमेश महाजन, कन्हेय्या अग्रवाल, ह.भ.प. कांतीलालबाबा महाराज, पिंटू राणे, भास्कर महाजन, सुधीर पाटील, हरिषशेठ गणवाणी, योगेश गजरे, लखमसिंह पटेल, प्रभाकर महाजन, उमेश महाजन, देवलाल पाटील, तुषार मानकर, लखन महाजन, पिंटू वाघ आदींसह मित्रपरिवार व नागरिक उपस्थित होते.