सपोनि नाईक यांच्या सतर्कतेने रावेरात टळला अनर्थ !

रावेर शालीक महाजन । सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी पेट्रोल बाँबसह तयारीत असणार्‍या जमावाला वेळीच धाव घेऊन हुसकावून लावल्याने रावेर येथील दंगलग्रस्त भागातील अनर्थ टळल्याची माहिती समोर आली आहे.

काल रात्री शहरात उसळलेल्या दंगलीत पोलिसांनी तत्परतेने कार्यवाही केल्याने मोठा अनर्थ होण्यापासून वाचल्याचे दिसून येत आहे. यात सहाय्यक पोलीस निरिक्षक शीतलकुमार नाईक यांना मिळताच ते आपले सहकारी पीएसआय सुनील कदम, पोलिस कर्मचारी जितु पाटील, महेंद्र सुरवाडे, अजय खंडेराव, नंदु महाजन निलेश चौधरी,विकास पहुरकर ओमप्रकाश सोनी यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले तेव्हा प्रचंड दगडांचा मारा सुरु होता. खाली दगडांचा खच असल्याने त्यांची गाडी अडकुन पडली त्यावेळी त्यांनी जिवाचीही पर्वा न करता थेट दोन्हीच्या मध्यभागी जाऊन पोहचले. त्यावेळी त्यांच्या गाडीवर मोठे दगड येत होते. तर बाजूला जाळपोळ होत होती. त्यांनी जमाव पांगवण्यासाठी वरिष्ठाशी बोलून तीन राउंड फायर केल्या. गोळ्यांचा आवाज ऐकुन दोन्ही बाजुचे जमाव मागे सरकून पळू लागले. यामुळे शीतलकुमार नाईक यांनी आपल्या सहकार्‍यांसह खाली उतरून तात्काळ दंगेखोरांवर लाठीचार्ज सुरु केला. यामुळे एका तासाच दंगल आटोक्यात आणली. कदाचित अजुन त्यांना उशीर झाला असता तर परिस्थितीने अजुन गंभीररूप धारण केले असते. कारण दंगेखोर पूर्ण तयारीनिशी उतरले होते. यात जाळपोळ करण्यासाठी त्यांनी दारूच्या बाटल्यांचा पेट्रोल बाँब म्हणून वापर करण्याची तयारीदेखील केली होती. मात्र शीतलकुमार नाईक आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हा डाव उधळून लावला. यामुळे दंगलीत मोठी हानी होण्यापासून वाचली. यामुळे नाईक आणि त्यांच्या सहकार्‍यांचे शहरवासियांनी कौतुक केले आहे.

Protected Content