Home Cities मुक्ताईनगर मराठी पाट्या लावलेल्या दुकानदारांचा मनसेतर्फे सन्मान

मराठी पाट्या लावलेल्या दुकानदारांचा मनसेतर्फे सन्मान

0
39

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर मनसे तालुक्याच्या वतीने मराठी पाट्या असलेल्या दुकानदारांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात येत आहे.

इंग्रजी पाट्या लावणाऱ्या दुकानदारांशी माय मराठीची अस्मिता जोपासण्यासाठी २००८ पासून राज साहेब, मनसे सैनिकांनी तगादा होता. लढा होता त्याची पूर्तता आज शासनाने कायद्यात पारित केले, असे थोडक्यात मनसे मुक्ताईनगर तालुका अध्यक्षांनी समज दिली. त्याअनुषंगाने मनसे पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष राहुल काळे, तालुका अध्यक्ष मधुकर भोई, भगवान वाघ, महेंद्र सिरसोदे, गोपाळ कोळी, रतिराम सिरसोदे, भगवान पांचाळ, किशोर भोई, रुपेश लोखंडे आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound