जळगाव, प्रतिनिधी | जी. एम. फाऊंडेशन व भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मिलिंद चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १८ वर्ष वयोगटातील युवक व युवतींसाठी लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
जुने जळगाव येथील भाग्य लक्ष्मी हाऊसजवळ आयोजित शिबिरात ७६० युवक व युवतींनी लसीकरण करून घेतले. भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आनंद सपकाळे, सरचिटणीस जितेंद्र चौथे, अक्षय जेजुरकर, सचिन बाविस्कर, राहुल मिस्तरी, विक्की सोनार, भुषण भोळे, अश्विन सैंदाणे , प्रतीक शेठ, रोहीत सोनवणे, गौरव पाटील, निखिल सूर्यवंशी, हर्षल चौधरी, महेश राठी, निर जैन,आकाश चौधरी, शुभम पाटील, भूषण आंबिकार उपस्थित होते. याश्वितेसाठी जूने जळगाव मित्र मंडळ, भारतीय जनता युवा मोर्चा जळगांव महानगर,ज़य हनुमान सांस्कृतिक मित्र मंडळ, विर जवान गृप, आयवा मित्र मंडळ, युवा ब्रिगेडियर, न्यु बाल मित्र मंडळ, क्रीडा विकास मित्र मंडळ, श्रीहरी मित्र मंडळ, कालींका माता चौक मित्र मंडळ यांनी सहकार्य लाभले.