पाळधी खुर्द व बुद्रुकच्या पाणी पुरवठा योजनेचे लवकरच भूमिपुजन : ना. गुलाबराव पाटील

पाळधी ता. धरणगाव प्रतिनिधी । पाळधी खुर्द आणि पाळधी बुद्रुक या दोन्ही गावांची पाणी समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी २१ कोटी रूपयांची पाणी पुरवठा मंजूर करण्यात आली असून याचे लवकरच भूमिपुजन करण्यात येणार असल्याची माहिती आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

 

पाळधी येथे विविध विकासकामांचे लोकार्पण करतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाळधी गावासोबत असणारे आपले ऋणानुबंध व्यक्त करत विकासकामांच्या माध्यमातून यामधून उतराई होण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केले. दरम्यान, आज पालकमंत्र्यांचे आज मोटारसायकल रॅलीद्वारे भव्य स्वागत करण्यात आले. तर मोटारसायकलवर स्वार होऊनच त्यांनी विविध विकासकामांच्या भूमिपुजनाला हजेरी लावली. याच कार्यक्रमात त्यांचा मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे आणि मुस्लीम पंच कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला. तर याच प्रसंगी ना. पाटील यांच्या हस्ते साई मंदिरा समोरील मैदानावर साई एकता क्रिकेट क्लबतर्फे आयोजीत करण्यात आलेल्या खुल्या प्लास्टीक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज पाळधी येथे विकासकामांचे भूमिपुजन करण्यात आले. ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून पाळधी बुद्रुक येथे शादीखाना सभागृहाचे बांधकाम (१२ लक्ष), गावांतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करणे (३० लक्ष) व गावांतर्गत रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविणे या करीता (२३ लक्ष) अशा ६५ लाखाच्या कामांचे भूमिपूजन श्रीफळ वाहून करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, मनसे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, पाळधी  बुद्रुक व खुर्द येथील सरपंच प्रकाशनाना पाटील , शरद कोळी व पं. स. सदस्य मुकुंदराव नन्नवरे , यासिन पठाण , माजी सभापती राजुभैया पाटील, उपसरपंच चंदन कळमकर, सौ.भारती पाटील, माजी सरपंच अरूण पाटील, चंदू माळी, दीपक राजपूत, संजय पाटील, अहमद पठाण , सुलतान पठाण, फिरोज हाजी पठाण, दानिश पठाण, ग्रामपंचायत सदस्य शरीफ देशपांडे, सादीक पटेल, डिगंबर माळी, सुधाकरण माळी, संजय माळी यांच्यासह परिसरातील सरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून पाळधी खुर्द आणि पाळधी बुद्रुक या दोन्ही गावांच्या समग्र विकासासाठी आपण प्रयत्नशील असून याचे दृश्य परिणाम आपल्याला दिसत असतील असे नमूद केले. पाळधीच्या विकासाला गती आली असून यात सातत्य राहणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

याप्रसंगी मुस्लीम समुदायासाठी शादीखाना मंजूर करून याचे भूमिपुजन करण्यात आल्याबद्दल मनसे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, मुस्लीम पंच कमेटी आणि दिलीपबापू पाटील यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा हृद्य सत्कार केला. तर साई एकता क्रिकेट क्लबतर्फे आयोजीत प्लास्टीक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन ना.गुलाबराव पाटील यांनी चेंडू टोलवून केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले. कोरोनाच्या नियमांचे पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Protected Content