Home Cities जामनेर ‘राहुल युवा संघा’च्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रतिक सुर्वे यांची निवड

‘राहुल युवा संघा’च्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रतिक सुर्वे यांची निवड

0
31

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी | ‘राहुल युवा संघ महाराष्ट्र राज्य’च्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रतिक सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे. ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’चे युवा नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या कार्याची माहिती जनमाणसांपर्यंत पोहचविण्यासाठी, प्रचार करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

राहुल युवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनंदन शनगराम यांनी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पंकज वाळेकर, अखिल भारतीय कोर कमिटी चेअरमन बलजीत सिंह, राष्ट्रीय उपाध्यक्ष युनिक संधु, प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र छात्र विंग धीरज आहिरराव ,यांच्या सही चे नियुक्ती पत्र देऊन निवड केल्याचे जाहिर केले आहे. प्रतिक सुर्वे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound