जळगाव प्रतिनिधी । शहरातील विसनजी नगरातील एका दुकानातून ७ हजार रूपये किंमतीचे कलरच्या बादल्यांची चोरी प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील जिल्हापेळ पोलीसांनी काही तासातच तीन जणांना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.
अकाउटंट विजेंद्र श्रावण सोनवणे, हेमंत महादू सोनवणे रा. रामेश्वर कॉलनी, आणि रफिक पिंजारी असे अटक केलेल्या संशयित तिन्ही आरोपींची नावे आहे. याबाबत माहिती अशी की, कल्पेश प्रवीणचंद्र वेद (वय-५०) रा. विसनजी नगर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. विसनजी नगरातील राजेश टेन्ट हाऊसच्या गल्लीत असलेले श्रीनाथजी एजन्सी नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानावर हेमंत महादू सोनवणे रा. रामेश्वर कॉलनी हा दुकानावर नोकरी करतो. २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दुकानावर काम करत असतांना हेमंत सोनवणे व त्याच्या सोबत असलेला अनोळखी व्यक्ती यांनी संगनमताने मिळून ५ हजार रुपये किमतीचा कलरचा प्रायमर आणि २ हजार रुपये किमतीचे कलर्स प्लास्टिकचे बादली असा एकूण ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोकॉ महेंद्र पाटील, पोलीस नाईक गणेश पाटील, पोलीस नाईक सलीम सुभान तडवी, पोकॉ रवींद्र साबळे, विकास पहूरकर, समाधान पाटील, विनोद पाटील यांनी संशयित आरोपी अकाउटंट विजेंद्र श्रावण सोनवणे, हेमंत महादू सोनवणे रा. रामेश्वर कॉलनी, आणि रफिक पिंजारी याना अवघ्या पाच तासात अटक केली आहे. तिघांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.