क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेत अभिवादन

जळगाव प्रतिनिधी । महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सकाळी महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अर्थात महिला मुक्ती दिनानिमित्ताने महापालिकेतर्फे सोमवार ३ जानेवारी रोजी सकाळी  ९.३० वाजेच्या सुमारास महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री महाजन यांच्याहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी सुरू केलेल्या चळवळीत आलेल्या अडचणींचा सामना कसा केला आणि मुला मुलींसाठी शिक्षणासाठी लोकांकडून होणार छळ देखील सहन करावा लागला असे सांगत त्यांनी केलेल्या महान कार्यालया उजाळा दिला. याप्रसंगी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड, उपायुक्त श्याम गोसावी, चंद्रकांत वांद्रे, गायत्री पाटील आदींसह महापालिका कर्मचारी यावेळी उपस्थित होते..

Protected Content