जळगाव प्रतिनिधी । शहरातील आकाशवाणी चौकातून पायी जाणाऱ्या तरूणाचा हातातून हिसकावून १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात तीन जणांनी दुचाकीवरून धुमस्टाईल लांबविला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, कल्पेश चंद्रकिरण सपकाळे (वय-२१) रा.गंधर्व कॉलनी, माधव मंदिराजवळ जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवारी १ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकाकडून पायी जात असताना टीव्हीएस कंपनीच्या मोटरसायकली वरून अज्ञात तीन येवून कल्पेश सपकाळे यांच्या हातातील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावला व दुचाकीने तीघे पसार झाले. याप्रकरणी रविवारी २ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कल्पेश सपकाळे याच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात तीन व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय गणेश देशमुख करीत आहे.