आज जिल्ह्यात आढळले ५ कोरोना बाधित रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । जिह्यामध्ये चोवीस तासांमत कोरोना बाधित ५ रुग्ण आढळून आला असून १ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात जिल्ह्यातून ५ बाधित रूग्ण आढळून आला आहे. यात जळगाव शहर १, भुसावळ २, चोपडा १ व यावल १ असे एकूण ५ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. आता जिल्ह्यात २४ अॅक्टीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तर एक रुग्ण बरा झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ४२  हजार ८३८ रुग्ण बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Protected Content