मुंबई प्रतिनिधी | अभिनेत्री सनी लिओनी ही एका गाण्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडली असून तिला अटक करण्याची मागणी होत आहे.
अभिनेत्री सनी लिओनी आता पुन्हा एका नवीन वादात अडकली आहे. मधुबन मे राधिका नाचे या गाण्यावरून मध्य प्रदेशात विरोध सुरू झाला आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सनी लिओनला इशारा देत माफी मागण्यास सांगितले होते. हिंदू देवतांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असे ते म्हणाले होते. सनी लिओनीच्या नवीन गाण्याबाबत राज्य सरकार कायदेशीर सल्लाही घेत असून जर सनी लिओनीने ३ दिवसांत गाण्याबद्दल माफी मागितली नाही आणि गाणे यूट्यूबवरून हटवले नाही, तर मध्य प्रदेश सरकार एफआयआर दाखल करेल, असा इशारा त्यांनी दिला होता. यानंतर आता तिला अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, सारेगामाने सोशल मीडियावर अधिकृत निवेदन करत म्हटले आहे की, आपल्या देशवासीयांच्या अलीकडील प्रतिक्रिया आणि भावनांचा आदर करून आम्ही मधुबन गाण्याचे नाव आणि बोल बदलू. येत्या ३ दिवसात सर्व प्लॅटफॉर्मवर जुन्या गाण्याऐवजी नवीन गाणे सादर केले जाईल. मात्र, आता तिला अटक करण्याची मागणी होऊ लागली आहे. लिओनीचे हे गाणे १९६०मध्ये आलेल्या ङ्गकोहिनूरफ चित्रपटातील मधुबन में राधिका नाचे या गाण्याची नवीन आवृत्ती असून हे गाणे कनिका कपूर आणि अरिंदम चक्रवर्ती यांनी गायले आहे. तर, गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केले आहे.