शेतकर्‍यांना खांद्यावर नेण्याची वेळ आलेली आहे ! : आ. मंगेश चव्हाण कडाडले

मुंबई प्रतिनिधी | राज्यात अनेक समस्या भेडसावत असतांना सरकार मात्र मृतावस्थेत आहे. यामुळे शेतकर्‍यांना आता खांद्यावर नेण्याची वेळ आली असल्याची घणाघाती टीका चाळीसगावचे आमदार यांनी आज विधीमंडळ परिसरात केली आहे. आज आ. चव्हाण हे सरकार हरवले आहे असे प्रिंट केलेला पोशाख घालून आले असून त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

आज दोन दिवसांच्या सुटीनंतर राज्य अधिवेशन पुन्हा सुरू होत आहे. आज विधानसभाध्यक्षांची निवडणूक घेण्याची शक्यता असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. यातच भाजपने आज अतिशय आक्रमक पवित्रा घेतला असून अधिवेशन सुरू होण्याच्या आधी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण Chalisgaon Mla Mangesh Chavan हे देखील सहभागी झाले. त्यांनी टोपीसह आपल्या शर्टवर सरकार हरवले आहे असे नमूद केले होते. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, राज्यात सध्या अनेक समस्या आहेत. शेतकरी तर समस्यांनी अक्षरश: हैराण झाले आहेत. मात्र त्यांना दिलासा देण्याऐवजी राज्य सरकारचे मंत्री भ्रष्टाचारात मग्न आहेत. या अधिवेशनात जनहिताच्या अनेक प्रश्‍नांवर चर्चा होणे अपेक्षित होते. तथापि, सरकारने प्रखर विरोधाच्या भितीमुळे अल्प काळाचे अधिवेशन घेतले. यामुळे आम्ही समस्या नेमक्या कुठे मांडाव्यात हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. यामुळे शेतकर्‍यांना खांद्यावरून नेण्याची वेळ आलेली आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी याप्रसंगी शेतकर्‍यांच्या वीज बिलांचा मुद्दा देखील उपस्थित केला. ते म्हणाले की, अनेक शेतकर्‍यांच्या वीज जोडण्यात तोडण्यात येत असल्याने शेतकरी हतबल झाले असतांना सरकारला याचे काही एक देणेघेणे नाही. सरकारने शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!