सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात जनमत प्रतिष्ठानतर्फे करीअर महोत्सव

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सरदार वल्लभभाई पटेल हॉल येथे जनमत प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी २६ डिसेंबर रोजी सकाळी करीअर महोत्सवाचे महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते उद्घाटन करण्‍यात आले.

 

शहरातील जनमत प्रतिष्ठानच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात करीअर महोत्सव घेण्यात आला. यावेळी किशोर आंबेगावकर, प्रफुल फालक यांनी आयुष्यात ध्येय ठेवणे खूप महत्त्वाचे असते या विषयावर व्याख्यान दिले. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, आमदार राजूमामा भोळे, नगरसेविाक निता सोनवणे, माजी उपमहापौर अब्दुल करीम सलार, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, विपुल फालक, विजय वानखेडे, निखिल कापडे, अश्विनी पाटील, हर्षाली पाटील, गणेश जोशी, विजय चव्हाण आदी उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी धेय्य बाळगा आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्न करा सांगितले. तर महापौर जयश्रीताई महाजन यांनी स्वप्न होते मोठे बघा की त्याच्यातून इतिहास घडवला जाणार असल्याचे सांगितले. जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांनी आभार व्यक्त केले तर सुत्रसंचालन प्रतिभा मेटकर यांनी केले.

Protected Content