Home क्राईम सिंधी कॉलनीत कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

सिंधी कॉलनीत कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

0
111


जळगाव प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी येथे चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना २ सप्टेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चारचाकीवरील चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , जळगाव शहरातील शिवाजीनगरातील भुरेमामलेदार प्लॉट जवळ सत्यनारायण शंकरराव चव्हाण वय ४९ हे वास्तव्यास आहेत. सत्यनारायण चव्हाण हे २ सप्टेंबर रोजी त्यांच्या (एमएच १९  डीडी ६८३५) या क्रमांकाच्या दुचाकीने सिंधी कॉलनी परिसरातून जात होते. यादरम्यान या परिसरातील पोलिस चौकीसमोर  चारचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली यात  सत्यनारायण चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात उपचारानंतर  तब्बल साडेतीन महिन्यांनी सत्यनारायण चव्हाण यांनी याप्रकरणी गुरुवार २३ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन चार दुचाकीवरील चालक विशाल राधेश्याम शिंपी रा. पाळधी ता.धरणगाव याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रदीप पाटील हे करीत आहेत.

 

 

 


Protected Content

Play sound