कर्नाटकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : दोषीवर कारवाईची राष्ट्रवादी पक्षांची मागणी (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी बंगळूर येथे विटंबना केली. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जळगाव महानगराच्या वतीने शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पाण्याने धुवून अभिषेक करत कर्नाटक सरकारचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.

 

जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पाण्याने धूवून अभिषेक (दुध , दही , लोणी , सहद ) करण्यात आला. यावेळी माजी मंत्री , जेडीसीसी बँक चेअरमन गुलाबराव देवकर , राष्ट्रवादी काँग्रेस महानगर जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी , प्रदेश चिटणीस ऐजाजभाई मलिक , जिल्हासरचिटणीस अशोक पाटील, सहकार आघाडी जिल्हा अघ्यक्ष वाल्मिक पाटील , महिला आघाडी महानगर अघ्यक्ष मंगला पाटील , दिलीप माहेश्वरी , विनोद देशमुख , मजहरभाई पठाण , सुनिल माळी, अमोल कोल्हे , सुशील शिदे, विशाल देशमुख, किरण राजपूत, राजू मोरे , रमेश बारे , अशोक सोनवणे, जितेंद्र चांगरे, राहुल टोके, सचिन पाटील इतर पदाधिकारी कार्यकते उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहे. आमच्या अस्मितेचा कोणी अपमान करत असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही. कर्नाटक सरकारने या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई व मुख्यमंत्र्यांनी बेतालव्यक्त करु नये  व समाज कंटकाला पाठीशी घालू नाही अशी मागणी याव्दारे करण्यात आली.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3012059799047252

 

Protected Content