जळगाव प्रतिनिधी । शहरातील पोलीस मुख्यालयासमोरून पायी जाणाऱ्या तरूणाच्या हातातील महागडा मोबाईल हिसकावून दुचाकीने दोन जणांनी पळ काढल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात दोन जणांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, हर्षल सुरेश पांडे (वय-३५) रा. विजय कॉलनी, जळगाव हा तरूण सोमवारी १३ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शहरातील पोलीस मुख्यालयासमोरील गाजरे हॉस्पीटल समोरून मोबाईलवर बोलत पायी जात असतांना त्यांच्या पाठीमागून अज्ञात दोन जण दुचाकीने येवून त्यांच्या हातातील १० हजार रूपये किंमतीचा महागडा मोबाईल जबरी हिसकावून लांबविला. हर्षलने आरडाओरड केली परंतू दोघ दुचाकीवर धुमस्टाईल पसार झाले होते. याप्रकरणी हर्षल पांडे यांनी जिल्हपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील करीत आहे.