‘त्या’ व्यवस्थापन परिषद सदस्याची चौकशी करा ; एनमुक्टोची मागणी

nmu new

जळगाव, प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या काही अभ्यास मंडळाच्या सदस्य, अध्यक्ष पदे रिक्त झाली असून इतर प्राधिकरणावरही प्राध्यापक, विद्यार्थी, संस्थाचालक, प्राचार्य यांच्या जागा रिकाम्या आहेत. त्या पारदर्शकपणे त्वरित भरण्यासाठी एक तर विद्यापीठाच्या स्थायी समितीची बैठक बोलवावी, किवां नामनिदर्शन करावयाचे असल्यास एनमुक्टोशी तत्काळ चर्चा करावी व विद्यापीठाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यवस्थापन परिषद सदस्याची चौकशी करण्याची अशी मागणी अध्यक्ष प्रा. डॉ. संजय सोनवणे यांनी केली आहे.

नुकतीच कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांच्याशी संघटनेची एनमुक्टो संघटनेची बैठकीत घेण्यात आली असल्याचे संघटनेने पत्रकाद्वारे कळविले आहे. या बैठकीत एनमुक्टोचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय सोनवणे यांनी विद्यापीठाच्या प्राधिकरणावर रिक्त पदांची संख्या जास्त वाढल्याने एकाधिकारशाही वाढता धोका संभवतो अशी भीती व्यक्त करण्यात केली. तसेच, पात्र व्यक्तींच्या क्षमतांच योग्य विनियोग होत नसल्याने त्या व्यक्ती निष्क्रीय होतात व विद्यापीठाचा तोटाच होतो म्हणून पारदर्शक प्रक्रिया राबवावी असे सांगितले. बैठकीत विद्यापीठाचा एका व्यवस्थापन परिषद सदस्याच्या कार्यपद्धती बाबत रोष व्यक्त केला. उन्नत अभिवृद्धी योजनेंतर्गत बढती मिळण्यासाठी विद्यापीठाने आयोजित केलेल्या केंद्रीय मूल्यमापन शिबिराबद्दल एनमुक्टोने कुलगुरूंचे अभिनंदन केले आहे. मात्र याच शिबिरात ग्रंथपालांना दोन वेळेस समितीसमोर यावे लागल्याबद्दल एका व्यवस्थापन परिषद सदस्याने शंका उपस्थित करून विद्यापीठाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला असून याची कुलगुरू यांनी गंभीर दखल घेऊन त्या व्यवस्थापन सदस्याची चौकशी करण्याची मागणी एनमुक्टोने केली आहे. या बैठकीत सावखेडकर, सुधीर पाटील, मनोज गायकवाड, किशोर कोल्हे, अनिल पाटील, चतुर सावंत, सचिन नांद्रे, पी. बी. अहिरराव, एस. आर. गोसावी, संध्या सोनवणे, इ. जी. नेहते, मोहन पावरा, गौतम कुवर, मधुलिका सोनवणे, मनोहर पाटील, दिनेश पाटील आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

Protected Content