जळगाव, प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील शिक्षणोत्तेजक मंडळ संचालित मांडळ येथील आर्दश हायस्कूल येथे संस्थेने केलेल्या बेकायदेशीर नियुक्त्या रद्द करावे व संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी मागण्यांसाठी माजी शिक्षक संदीप शिरसाट यांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करत आहेत.
संदीप शिरसाट यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना सांगितले की, संदीप शिरसाट यांना ५ फेब्रुवारी २०१४ रोजी आर्दश हायस्कूल येथे रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती.मात्र, सन २०१६-१७ मध्ये भरती झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची एक ही रिक्त पद नसतांना मागील तारखेत म्हणजे सन २०११-१२ पासून मान्यता काढून आणण्यात आल्या. याबाबत संदीप शिरसाट यांनी वारंवार प्रशासनाला व जिल्हा परिषदकडे तक्रार अर्ज सादर केले. तरी देखील त्यांना न्याय मिळाला नाही. दि. ५ सप्टेंबर रोजी संदीप शिरसाट यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानानंर तत्कालीन प्रभारी शिक्षण अधिकारी के. डी. चव्हाण मॅडम यांनी संस्थेने संबंधितांचे कागदपत्रे आणून द्यावेत अन्यथा मान्यता रद्द करण्यात येईल असे आदेश दिले होते. यानंतर श्री. शिरसाट यांनी २५ ऑक्टोबर २०११ रोजी बेमुदत आमरण उपोषण केले असता चव्हाण मॅडम यांनी सुनावणीच्या वेळी कागदपत्रे आणण्याचे पुन्हा आदेश काढले. मात्र, मुख्याध्यापक व संस्थेने यांनी अद्यापही के. डी. चव्हाण मॅडम यांच्याकडे किंवा जिल्हा परिषदेत सादर केलेले नाहीत. संस्थेचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडील कागदपत्रे चोरीस गेले असून कागदपत्रे नाहीत. असे असतांना चव्हाण मॅडम कोणतीही कारवाई करत नसल्याने त्यांना लाच देण्यात आली असल्यानेच त्या आदेश देत नसल्याचा गंभीर आरोप श्री. शिरसाट यांनी यावेळी केला आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/4551458708303402