रावेर तालुक्यात अनअधिकृतरित्या दारूची सर्रास विक्री – कारवाईची मागणी

रावेर प्रतिनिधी | रावेर तालुक्यात ढाब्यावर किंवा अनेक ठिकाणी अनअधिकृतरित्या दारूची सर्रास विक्री होत होत असून त्यास आळा बसावा अशी नागरिकांकडून आहोत आहे.

रावेर तालुक्यात जेवणाच्या ढाब्यावर अनअधिकृत विक्री होणाऱ्या दारूकडे उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरिक्षकांचे दुर्लक्ष होत आहे. महामार्गाला लागून असलेल्या जेवण्याच्या ढाब्यावर रात्रीच्या वेळेस सर्रास मोठ्या प्रमाणात अनअधिकृत दारूची विक्री केली जात असल्याची ओरड असून याकडे वरीष्ठ अधिका-यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

ढाब्यावर होणारी अनअधिकृत दारु, बनावट हातभट्याद्वारे अवैध पध्दतीने निर्माण होणाऱ्या दारू, अनाधिकृत वाहतूक होणाऱ्या दारूला आळा बसवण्याची जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाची आहे. परंतु रावेर तालुक्यात महामार्गाला लागून असलेल्या अनेक ढाब्यावर अनअधिकृत दारूची सर्रास विक्री होत आहे.

चार जण निलंबित तरी परिस्थिती जैसे-थे

दुर्लक्ष व कर्तव्यात कसूरचा ठपका ठेवत यापूर्वी उत्पादन शुल्क विभागाच्या चार जणांना यावर्षी जुलै महिन्यात निलंबित केले होते. तरीसुध्दा परिस्थिती जैसे-थे आहे. उत्पादन शुल्क विभागाचे यावल भागाचे दुय्यम निरिक्षक जळगाव येथून अप-डाऊन करून रावेर व यावल भागाचा कारभार बघत असल्याने अनअधिकृत दारू विक्री करणारे संधीचा फायदा घेतात. रावेर तालुक्याला खरगोन व बुर-हानपुर या जिल्हाच्या सीमा लागून असून दोन्ही जिल्हातील मार्ग रावेर तालुक्यातुन महाराष्ट्राच्या इतर जिल्हात जातो.

बहुतेक ठिकाणी नियमावली धाब्यावर

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम शॉप अॅक्टनूसार उत्पादन शुल्क विभागाची नियमावली लावणे, रेटबॉर्ड लावणे, हॉटेलमध्ये बालकांना बंदी, सकाळी १० च्या आत दारूची दुकाने उघडू नये, वाईनशॉपमध्ये परवान्याशिवाय मद्यविक्री करू नये, परमिटरूम, हॉटेलमध्ये बालकामगार नेमू नयेत आदी नियम असतात. बहुतेक ठिकाणी या नियमांना फाटा देण्यात आल्याचे दिसून येत आहे.

थर्टीफस्ट जवळ असतांना निरिक्षकांचे दुर्लक्ष

महीनाअखेर थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर रावेर तालुक्यातील तरूणाईकडून पार्टी प्लानिंग सुरू आहे. परंतु बहुतेक ठिकाणी अनाधिकृत दारूला लगाम लावण्यात दुयम निरिक्षकांना अपयश येत आहे. या महिनाअखेरीस मद्यविक्रीतून लाखो रूपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. रावेर परिसरात अनधिकृत मद्यविक्रीचा व्यवसाय जम धरू लागल्याने नागरिकांमधून संतापाची लाट उसळत आहे.

 

Protected Content