रावेर पोलिसांकडून अवैध धंद्यांवर छापे ; अनेकांविरुद्ध प्रतिबंधकात्मक कारवाई

raver ps

रावेर(प्रतिनिधी) लोकसभा निवडणुक हि निर्भयपणे व शांततेत पार पडावी म्हणून रावेर पोलिस स्टेशन मोठया प्रमाणात प्रतिबंधकात्मक कारवाई सुरु आहे. रावेर  पोलिस स्थानक हद्दीत अवैध दारू भट्टी , अवैध दारू विक्री , जुगार अड्ड्यांवर छापेमारी सुरु आहे. तसेच दोन जणांना हद्दपार करण्यात आले असून इतर ८ ते १० जणांदेखील हद्दपार केले जाणार आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे चालक व गुन्हेगारांमध्ये प्रचंड खळबळ आहे.

 

रावेर पोलिसांनी आतापर्यंत दारूबंदीचे एकुण ०६ गुन्हे दाखल केले आहेत. तर अवैध जुगार खेळणारे इसमांवर छापेे घालून एकुण ०२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ३५३ इसमांवर प्रतिबंधक कारवाया करण्यात आलेल्या आहेत. तर रावेर हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार सुधाकर पंडीत लहासे, रविंद्र गौतम कासोदे (दोन्ही रा. अहिरवाडी ता . रावेर) यांना फैजपूरचे उपविभागीय दंडाधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या आदेशान्वये जळगाव , धुळे , नंदूरबार , बुलढाणा व औरंगाबाद या जिल्हयांतून ०६ महिन्या करीता हद्यपार करण्यात आहे. तसेच त्यांना लालबाग पोलीस स्थानकाच्या हद्दीत राहणारे त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. तसेच ८ / १० इसमांवर हद्यपारीची कारवाई करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुक हि निर्भयपणे व शांततेत पार पडावी व कोणीही कायद्याचा भंग करणार नाही. मतदारांवर कोणीही कोणत्याही प्रकारे दबाब आणणार नाही व निवडणुक शांततेत पार पडावी, या उद्देशाने वरील प्रतिबंधक व हद्यपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शना वरुन पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी कारवाई केली आहे

Add Comment

Protected Content