फैजपूर, ता.यावल प्रतिनिधी | अविरत यशाची अखंडित परंपरा असणाऱ्या फैजपूर येथील जे.टी.महाजन इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्यपदाचा अधिकृत कार्यभार डॉ आर डी पाटील यांनी स्वीकारला आहे.
‘डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे बाटू’च्या मान्यतेनंतर त्यांची विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सतत नाविन्याचा ध्यास घेणाऱ्या, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या जे.टी.महाजन इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्यपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
१९८४ पासून दर्जेदार शिक्षण देत उत्तम अभियंता घडविणाऱ्या ‘एनबीए’सह ‘नॅक’ मानांकित या संस्थेचे अध्यक्ष शरददादा महाजन, उपाध्यक्ष उल्हास चौधरी, सचिव विजय झोपे व सर्व संचालक मंडळ सर्व विभाग प्रमुख, डीन अकॅडमिक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्राचार्य डॉ आर डी पाटील यांचे अभिनंदन केले आहे.