फैजपूर, ता. यावल, प्रतिनिधी | येथील जे. टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये करियर गायडन्सवर वेबिनारचे आयोजन करण्यात आले. यात तज्ज्ञांनी विद्यार्थी व पालकांना करियरबाबत मार्गदर्शन केले.
सध्या बारावीनंतर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या पार्श्वभूमिवर, पालक आणि विद्यार्थ्यांनी नेमका कोणता पर्याय निवडावा याबाबत अनेकांना संभ्रम वाटतो. या अनुषंगाने जे. टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजच्या संगणकशास्त्र शाखेतर्फे करियर गायडन्स या विषयावर वेबिनार आयोजीत करण्यात आला. हर्षल महाजन यांनी यात मार्गदर्शन केले.
हर्षल महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनात विविध मुद्यांना स्पर्श केला. यात प्रामुख्याने नवी विद्यार्थ्यांसाठी मुलाखतीची तयारी, ट्रेंडींग टेक्नॉलॉजी, जावासक्रीप्ट आणि याचे भविष्य, प्रत्यक्षातील प्रकल्पांमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा उपयोग, प्रारंभीच्या करियरच्या कालावधीसाठीच्या टिप्स आदींचा समावेश होता. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी विचारलेल्या शंकांचे समाधान देखील केले.
या वेबिनारच्या यशस्वीतेसाठी जे. टी. महाजन इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. आर.डी. पाटील व कॉलेजच्या संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एस. भगत यांच्या मार्गदर्शनासाठी प्रा. हितेश चौधरी, प्रा. मोहिनी चौधरी, प्रा. अमेय नेहेते, प्रा. पी. एस. देशमुख,प्रा. देवेंद्र भारंबे, प्रा. किर्ती पाटील आणि पी. वेलचंद यांनी सहकार्य केले.
दरम्यान, फैजपूर येथील जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आलेला आहे. सदर कॉलेज १९८४ पासून अभियांत्रिकी व मूल्य शिक्षण यांचा समन्वय साधत सातत्याने प्रगतिपथावर आहे. महाविद्यालयास एआयसीटीई नवी दिल्लीची मान्यता असून इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स,कोलकता चे सुद्धा मानांकन आहे.महाराष्ट्र शासन द्वारा महाविद्यालयात अदर्जा प्राप्त आहे. तसेच कॉलेज डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे बाटूशी संलग्नित आहे. कॉलेेजमध्ये बी. टेक. साठी मेकॅनिकल, सिव्हिल, कम्प्युटर,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखा उपलब्ध आहेत. एम टेक साठी मेकॅनिकल (मशीन डिझाईन) व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या दोन शाखा उपलब्ध असून कॉलेज कोड इएन ५१६८ आहे. कोरोनामुळे बिघडलेली अर्थव्यवस्था व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या विपरीत परिणामाचा विचार करून जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेजने सामाजिक बांधिलकी म्हणून अत्यल्प फी आकारून इंजीनियरिंग शिक्षण उपलब्ध करून दिलेले आहे. याच्या अंतर्गत एससी/एसटी/एनटी/एसबीसी आदी प्रवर्गांना मोफत शिक्षण तर ओबीसी संवर्गासाठी कंप्यूटर व सिव्हिल या ब्रँचसाठी २०००० रुपये; मेकॅनिकल साठी १०००० रुपये तर ई अँड टी सी साठी ५००० रुपये फी ठरविण्यात आलेली आहे.
प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी खालील ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रा. जे. बी. भोळे ९३२५१८८९८२
डॉ. के. जी. पाटील ९६३७०७१२९१