Home क्राईम दीपनगर येथे अज्ञाताने फोडली एसटी (व्हिडिओ)

दीपनगर येथे अज्ञाताने फोडली एसटी (व्हिडिओ)

0
28

भुसावळ दत्तात्रय गुरव | आज भुसावळ आगारातून बोदवड येथे प्रवासी घेऊन जाणारी बस निघाली होती, ही बस दीपनगर जवळ अज्ञात व्यक्तीने दगड मारून फोडली आहे हा प्रकार अचानक सुरू झाल्यामुळे प्रवासी गोंधळून गेले होते.

 

अनेक दिवसांपासून बंद असलेली लालपरी आज भुसावळ आगारातून धावत असतांना एमएच २० बीएल ०९४७ या क्रमाकाची बस प्रवासी घेऊन बोदवड येथे निघाली असताना दिपनगरजवळ अज्ञात लोकांनी बस वरती दगडांचा मारा केला. सुदैवाने प्रवाशांना कोणीतीही इजा झाली नाही. यामध्ये बसचे नुकसान झाले असून बस प्रवासी घेऊन जाणारी बस जागेवरच थांबवण्यात आली आहे. या ठिकाणी भुसावळ पोलीस स्टेशनचे अधिकारी पंचनामा करण्यासाठी दाखल झाले आहेत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/446280437117859


Protected Content

Play sound