जळगाव प्रतिनिधी । महापालिकेची विनापरवानगी न घेतला शहरातील शुभेच्छा फलक लावल्याप्रकरणी बांधकाम व्यवसायिक खुबचंद साहित्या यांच्याविरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला
शहरातील गोंविदा रिक्षा स्टॉप ते टॉवर चौक दरम्यान विना परवानगी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचे फलक बांधकाम व्यावसायिक खुबचंद प्रेमचंद साहित्या (रा.मोहाडी रोड, जळगाव) लावलेले असल्याची गोपनिय माहिती शहर पोलीसांनी मिळाली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी फलकांबाबत खात्री करण्याच्या सूचना गोपनीयचे कर्मचारी नरेंद्र अशोक ठाकरे यांना केल्या होत्या. त्यानुसार त्यांनी टॉवर चौक ते गोविंदा रिक्षा स्टॉप दरम्यान फलकांची पाहणी केली. अंदाजे २० फलक या रस्त्यावर लावण्यात आले होते. फलकाबाबत परवानगी घेतली आहे किंवा नाही याची मनपात जाऊन खात्री केली असता फलक लावण्यात परवानगी नसल्याचे उघड झाले. शहर विद्रुपीकरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी नरेंद्र ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन फलक लावणारे खुबचंद साहित्या यांच्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संजय बडगुजर करीत आहेत.