अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा 1994 -95 एस.एस.सी वर्ग या बॅचचे आयोजन करण्यात आले होते. स्नेह मेळाव्यासाठी गावातील तसेच बाहेर गावी असलेले, आजी-माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच गुरुजन वर्ग उपस्थित होते.
तब्बल 25 ते 26 वर्षांनंतर गुरू व शिष्य दिवाळी निमित्ताने एकत्र आल्याने हा स्नेहमेळावा पार पडला. सदरील कार्यक्रम गावाबाहेर शेतात निसर्गरम्य वातावरणात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी प्राचार्य जी आर चौधरी हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक तसेच गुरुजन वर्ग होते.मा. प्राचार्य चौधरी सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.दिप प्रज्वलना नंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.यात शिक्षक तसेच चांगल्या हुद्द्यावर असणारे विद्यार्थी यांचा देखील यथोचित सत्कार करण्यात आला.
सत्कारानंतर माजी विद्यार्थ्यांकडून आजी माजी शिक्षक यांना सन्मानित करून ऋननिर्देश दिले.आयुष्यात चांगला मित्र भेटणे हे सुद्धा भाग्यच लागत असे प्रतिपादन शारदा विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक हिरालाल भोई सर यांनी केले.यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी एकेक किस्से,हास्य कल्लोळ सांगत आपल्या भावनाना वाट मोकळी करून देत मनोगत व्यक्त केले.तब्बल 26 वर्षानंतर माजी विद्यार्थी एकत्र आले; व आपल्या गुरुजनाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.यामुळे सर्व शिक्षक स्टॉप त्यांचा या अनोख्या सत्काराने भारावून गेले.सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी डी डी राजपूत, सूर्यवंशी सर दिनेश महाजन, रत्नाकर गुरव तसेच मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही पी महाजन यांनी तर आभार प्रकाश महाजन यांनी मानले. सदरील कार्यक्रम पाहून सर्वच मान्यवर तसेच आजी माजी शिक्षक व मुख्याध्यापक यांनी आनंद व्यक्त केला.