१९४७ मध्ये भीक मिळाली, २०१४ ला मिळाले स्वातंत्र ! : कंगना

मुंबई प्रतिनिधी | भारताला १९४७ साली भीक मिळाली होती, तर देशाला खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाल्याचे वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्याने नवा वाद सुरू झाला आहे.

एका मुलाखतीत कंगना राणावत हिनं स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका प्रश्नाचं उत्तर देताना कंगना म्हणाली की, स्वातंत्र्य जर भीक म्हणून मिळालं असेल तर ते स्वातंत्र्य असेल का?  सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस या लोकांबाबत बोलायचं झाल्यास, या सर्वांना माहित होतं की रक्त सांडलं तर हे लक्षात ठेवावं लागेल की हे आपल्या भारतीयांचं नसेल. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण ते स्वातंत्र्य नव्हतं. भीक होती. खरं स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळालं. १९४७ साली तर आपल्याला भीक मिळाली होती असे कंगना म्हणाली.

 

दरम्यान, कंगनाच्या या वक्तव्यावरून आता अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. कंगानाच्या या वक्तव्याचा भाजप खासदार वरुण गांधी  यांनी समाचार घेतला असून हा स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांचा अपमान असल्याचा आरोप करत तिचा समाचार घेतला आहे. अकाली दल पार्टीचे वरिष्ठ नेता मनजिंदर सिंह सिरसा यांनाही कंगानाच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

Protected Content