Home Uncategorized उत्तर महाराष्ट्र पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी महेश पाटील

उत्तर महाराष्ट्र पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी महेश पाटील


यावल,प्रतिनिधी| तालुक्यातील उंटावद येथील महेश पाटील यांची उत्तर महाराष्ट्र पत्रकार संघाच्या विभागीय उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. याबाबत त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

किनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समीतीत नुकतीच भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अय्युब पटेल हे होते. बैठकीत महेश पाटील यांच्या उत्तर महाराष्ट्र विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड केल्याचे निवडपत्र संस्थापक अध्यक्ष अय्युब पटेल यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी भारतीय पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भागवत चौधरी , उपाध्यक्ष सचिन नायदे , सचिव शब्बीर खान , जिल्हा सहकार्यवाहक नितिन बडगुजर, विभागीय संघटक मनोज नेवे , सदस्य सुनिल पिंजारी , विक्की वानखेडे , दिपक नेवे, अरूण अजमेरा आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांच्या विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. या चर्चेत अय्युब पटेल , महेश भागवत पाटील , प्रकाश चौधरी यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले.


Protected Content

Play sound