Home क्राईम शेतात अनोळखी व्यक्तीने घेतला गळफास

शेतात अनोळखी व्यक्तीने घेतला गळफास

0
100

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर शेंदुर्णी रोडवर सांगवी शिवारात आज सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेतकरी ईश्वर नामदेव क्षीरसागर यांच्या शेताचे बांधावरील असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेतला आहे. सदर इसमाची ओळख पटलेली नसुन ओळख पटवण्यासाठी पहूर पोलीस स्टेशनचे पी. आय. अरुण धनवडे यांनी आवाहन केले आहे.

 


Protected Content

Play sound