Home Uncategorized नारायण राणे हेच खंजीर खुपसणारे नेते : विनायक राऊत

नारायण राणे हेच खंजीर खुपसणारे नेते : विनायक राऊत

0
25

मुंबई प्रतिनिधी | कें्रदीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या टिकेवर पलटवार करत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

 

 

खासदार विनायक राणे म्हणाले की, नारायण राणे यांनी उपकारकर्त्या शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. सोनिया गांधींच्या पाठीत खंजीर खुपसला, आदरणीय शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि इतरांना शहाणपण शिकवायला निघालेत आहेत.

राऊत पुढे म्हणाले की, गटारीचा महामेरू म्हणजे नारायण राणे आहेत.सर्व पक्षांशी गद्दारी कोणी केली असेल तर नारायण राणे यांनी केली आहे. कॉंग्रेस मध्ये गेलात शिवसेनेशी गद्दारी करूनच गेलात नाव असा सवाल विनायक राऊत यांनी नारायण राणेंना केला आहे.

 

 

नारायण राणे यांनी यापूर्वी सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्माननीय गृहमंत्री अमित शाह यांचा खालच्या भाषेमध्ये उल्लेख केला होता. नारायण राणेंनी अत्यंत खालच्या भाषेत पंतप्रधानांवर टीका केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर टीका केली होती, त्याबद्दल वाचन करावं, असं प्रत्युत्तर विनायक राऊत यांनी दिलंय. देवेंद्र फडणवीसांचं किती कुंडल्या बाहेर काढल्या? विधानपरिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्या इतिहासाचं वाचन केलं होतं ते विसरलात का? असं राऊत म्हणाले.
नारायण राणेंनी सिल्वासामध्ये जाऊन दादरा नगर हवेली पोटनिवडणुकीसाठी प्रचार केला असता तर आणखीन मतं डेलकरांना मिळाली असती आणि त्यांच्या उमेदवाराला किती मतं मिळाली असती हे कळल असतं, असं विनायक राऊत म्हणाले. चिपी विमानतळावर मुख्यमंत्र्यांनी भाषण करताना कान टोचण्याची वेळ नारायण राणे यांनीच आणलीय, असं विनायक राऊत म्हणाले.चिपी विमानतळाची जमीन तुम्ही हडप करायला निघाला होतात,त्याचा भांडाफोड शिवसेनेने केला आहे, असं विनायक राऊत म्हणाले आहेत.


Protected Content

Play sound