Home Cities यावल प्रा. व्ही. एल. फिरके यांचे निधन

प्रा. व्ही. एल. फिरके यांचे निधन

0
40

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील जे.टी. महाजन अभियांत्रीकीतील प्राध्यापक व्ही. एल. फिरके (राजू सर) यांचे आज निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, येथील जे.टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे व्ही. एल. फिरके उर्फ राजू सर (वय ४८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या निधनाने जे.टी. महाजन अभियांत्रीकीवर शोककळा पसरली आहे. संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन यांच्यासह संचालक मंडळ आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.


Protected Content

Play sound