जळगाव प्रतिनिधी । दिवाळी सणात खाद्य पदार्थाची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते. या अनुषंगाने दिवाळीच्या काळात भेसळयुक्त खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती युवा आघाडीच्या वतीने आंबेडकर मार्केट येथील अन्न व औषध प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
प्रहार जनशक्ति युवा आघाडीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने शासनाच्या नियमानुसार बाजार पेठ खुले करण्यात आले आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने जिल्ह्यात खाद्य पदार्थाची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते. या दिवसात अन्न पदार्थ तयार करतांना भेसळ केली जाते. अन्न भेसळीमुळे नागरीकांचे आरोग्य धोका उद्भवू शकतो. खाद्य भेसळ करणाऱ्यांनी मोठ्या साठेबाजी केली जाते. ऐण दिवाळी नागरीकांची मोठ्या प्रमाणावर मिठाई व इतर वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी केली जाते. प्रशासकीय अधिकारी यांनी कर्मचारी यांची समिती गठीत करून पथक तयार करून दुकानांची तपासणी करण्यात यावी. यापुर्वी देखील अनेक वेळा अन्न व औषध प्रशासनाने भेसळ करणाऱ्यावर कारवाई केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दुकानांची तपासणी करून भेसळ करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.
या निवेदनावर प्रहार जनशक्तीचे शहर युवक अध्यक्ष निलेश बोरो, शहराध्यक्ष मोहन माळी, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, युवक उपाध्यक्ष सागर गवळी, हरीष कुमावत, युवक सहचिटणीस जितेंद्र वाणी, युवक संघटक लक्ष्मण पाटील, धनंजय आढाव, शेख शकील शेख मुतालीक, जैनुल शेख यांच्या सह आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.