आजाराला कंटाळून वृध्दाने उचलले टोकाचे पाऊल

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मनवेल येथील ६५ वर्षीय वृध्दाने आपल्या आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना १३ आँक्टोंबर २०२२ रोजी दुपारी घडली. यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गोवर्धन बळीराम भालेराव (वय ६५) रा. मनवेल ता.यावल असे मृत वृध्दाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोवर्धन भालेराव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना दुर्धर आजार जडला होता. नेहमीप्रमाणे घरातील सदस्य शेतात कामाला निघून गेले होत. त्यावेळी गोवर्धन नाती सोबत घरीच होते. त्यांनी नातीला चहा बनविण्यासाठी सागीतले व घरा शेजारी असलेल्या छप्परात छताला असलेल्या लाकडी सऱ्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुल, सूना नातंवड असा परीवार आहे. मयत गोवर्धन भालेराव यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. दगडी गावाचे पोलीस पाटील विठ्ठल गोरख कोळी यांनी खबर दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करीत आहे .

Protected Content