शेतकऱ्यांच्या विराट मोर्चाला उपस्थित राहण्याचे भाजपाचे आवाहन

यावलप्रतिनिधी | शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यास महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरत असल्याने येत्या १ नोव्हेंबर रोजी भाजपकडून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहे. यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी येत्या १ नोव्हेंबर रोजी भाजपकडून विराठमोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात बैठीकीचे आयोजन यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी या विराट मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्तीती लावण्याचे आवाहन भाजपने केले आहे. याप्रसंगी मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद जिवराम महाजन , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक कृषी पंडीत नारायण शशीकांत चौधरी , पंचायत समितीच्या सभापती पल्लवी पुरुजीत चौधरी , उपसभापती योगेश दिलीप भंगाळे , कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालीका कांचन फालळ ,नगरसेवक डॉ . कुंदन फेगडे , भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे , तालुका सरचिटणीस विलास चौधरी , सरपंच परिषदचे जिल्हाध्यक्ष पुरूजीत गणेश चौधरी , माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षल पाटील, जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे संचालक गणेश नेहते , भरत महाजन, कृउबा माजी सभापती पांड्ररंग सराफ , भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे ,लहु पाटील , सलीम तडवी, किशोर कुलकर्णी, गोपाळ सिंग पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने  उपस्धित होते. दरम्यान बैठकीत राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विषयावर डॉ कुंदन फेगडे, किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष नारायण चौधरी , मसाकाचे चेअरमन शरद महाजन ,पुरूजीत चौधरी , हर्षल पाटील आदींनी मार्गदर्शन केले. व १ नॉव्हेबर रोजी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या व  प्रश्नासाठी जळगाव येथे आयोजीत आंदोलनात शेतकरी बांधवांना  सहभागी होण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी प्रस्तावाना सागर महाजन यांनी केले. सुत्रसंचालन विलास चौधरी यांनी तर आभार नितिन चौधरी यांनी मानले.

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content