Home धर्म-समाज पाचोऱ्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम

पाचोऱ्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम

0
25

पाचोरा प्रतिनिधी । सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या दि. ३१ ऑक्टोबर रोजी पाचोरा येथील सुप्रसिध्द ध्येय कॅरिअर अॅकेडमीतर्फे शहरासह तालुक्यातील सर्व गुर्जर समाज आणि तत्सम पोटजाती मधील बांधवांनी येत्या ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उपस्थितीत राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, सकाळी १० वाजता सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त ध्येय करिअर अँकेडमी, गणेश कॉलनी पाचोरा जि. जळगाव येथे गुर्जर व त्या मधील सर्व पोट जाती समाजातील बंधु – भगिनींनी सदर कार्यक्रमास उपस्थीत राहावे. तसेच गुर्जर समाजातील  विद्यार्थी – विद्यार्थीनी व युवक – युवतींना मनोगत व्यक्त करायचे असेल त्यांनी तयारी सह कार्यक्रमास उपस्थीती द्यावी. विशेष – मनोगत व्यक्त करणाऱ्या सर्व वक्त्यांना प्रोत्साहन पर बक्षिसे देण्यात येतील असे आवाहन प्रकल्प प्रमुख संदीप महाजन यांनी केले आहे.

 


Protected Content

Play sound