Home राजकीय मोदींना रोखण्यासाठी ख्रिश्चन आणि इस्लामिक देशांकडून फंडिंग – रामदेव बाबा

मोदींना रोखण्यासाठी ख्रिश्चन आणि इस्लामिक देशांकडून फंडिंग – रामदेव बाबा


ramdev 118708 730x419 m

जोधपूर (वृत्तसंस्था) आगामी लोकसभा निवडणुकीवर देशाचचं नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात षडयंत्र रचले जात आहे. देशविघातक शक्तींना भारतामध्ये ख्रिश्चन आणि इस्लामिक देशांकडून फंडिंग होत आहे. असा गंभीर आरोप योगगुरु बाबा रामदेव यांनी आज येथे केला. जोधपूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

 

यावेळी रामदेव बाबा म्हणाले की, देशामध्ये तसेच देशाच्या बाहेरही देशविघातक शक्ती आहे, त्यांच्याकडून लोकसभा निवडणुकीसाठी हजारो-लाखो कोटी रुपये फंडिंग केले जात आहे. ख्रिश्चन देश आणि इस्लामिक देशांकडून हा सगळा पैसा भारतात येतोय. नरेंद्र मोदी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे षडयंत्र रचलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

नरेंद्र मोदींचे चरित्र स्वच्छ आहे, मोदी राष्ट्रधर्माला कर्म मानून देशसेवा करत आहे. देशातील शेतकरी, सामान्य वर्ग, सीमेवरील जवानांच्या भविष्यासाठी ते काम करत आहे. अनेक विकास कामे त्यांनी देशात केली आहेत. शिक्षण, आरोग्याची काळजी देशाचे पंतप्रधान करत आहेत. दरम्यान २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सगळीकडे नरेंद्र मोदींचेच वारे वाहत आहेत, त्यामुळे जनता पुन्हा मोदींनाच निवडून देईल, असा विश्वासही रामदेव बाबांनी यावेळी व्यक्त केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound