Home Cities जळगाव गुलाबराव देवकर यांची असोदा येथे प्रचार व संवाद रॅली

गुलाबराव देवकर यांची असोदा येथे प्रचार व संवाद रॅली

0
74

असोदा (प्रतिनिधी)  जळगाव लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस, रिपाई व मित्रपक्षांच्या महाआघाडीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव देवकर यांनी  प्रचारार्थ असोदा गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी ग्रामस्थ, युवा वर्गाशी संवाद साधत आदर्श ग्रामविकासासाठी परिवर्तनाचे आवाहन केले.

गुलाबराव देवकर यांना  ग्रामस्थांनी गावातून अधिक मताधिक्य देण्याचे आश्वासन दिले. असोदा-लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ आज असोदा गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, ग्रामस्थ, युवा वर्गाशी संवाद साधत आदर्श ग्रामविकासासाठी परिवर्तनाचे आवाहन केले. यावर ग्रामस्थांनी गावातून अधिक मताधिक्य देण्याचे आश्वासन दिले. प्रचारादरम्यान गावातील हनुमान मंदीर, छ. शिवाजी महाराज, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्यासह पीरबाबा दर्गावर माल्यार्पण करत वंदन केले.ढोल ताश्यांच्या गजरात निघालेल्या प्रचार संवाद रॅली दरम्यान अनेक ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत तर महिला भगिनींनीकडून औक्षण करण्यात आले.
या संवाद रॅलीत माजी आमदार दिलीप सोनवणे, माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख गोपाळ जिभाऊ पाटील, जि.प.सदस्य रवि देशमुख, माजी सदस्य पंकज महाजन, माजी पं.स. सभापती दिलीप पाटील, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, माजी अध्यक्ष गोकुळ चव्हाण, युवक अध्यक्ष विनायक चव्हाण, बाजार समिती संचालक प्रशांत पाटील, डाॅक्टर सेल तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील, या पदाधिकाऱ्यांसमवेत उपसरपंच अरुण कोळी,संजय बिऱ्हाडे, ग्रा.पं.सदस्य हेमंत पाटील, बाळासाहेब पाटील, सुनिल पाटील, अरुण माळी, विजय भोळे, उद्धव पाटील, भास्कर पाटील, बंडू भोळे, धवल पाटील, संजीव पाटील, चित्रनिश पाटील, सुरज पाटील, काँग्रेसचे शैलेश पाटील, सलीम पिंजारी, वाहेद खाटीक, अमोद्याचे नवल पाटील, भादलीचे प्रफुल्ल पाटील यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ व युवा वर्ग सहभागी झाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound