भडगाव येथे गिरणाई महोत्सव उत्साहात

भडगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पंचायत समिती भडगाव येथे गिरणाई महोत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले होते.

उमेद अभियान खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील महिलांकरीता कल्याणकारी असून महिला कर्ज वेळेवर परतफेड करून आपल्या कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यास मदत करीत आहे, असे प्रतिपादन आ. किशोर पाटील यांनी केले असून ते भडगाव पंचायत समिती येथे गिरणाई महोत्सव २०२१ चे प्रसंगी बोलत होते.

अध्यक्षस्थानी आ. किशोर पाटील होते. यावेळी व्यासपिठावर माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील (पाचोरा), तहशिलदार मुकेश हिवाळे तहसीलदार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे, तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोराडे, उमेदचे जिल्हा व्यवस्थापक हरेश्वर भोई, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, विकास पाटील, रामकृष्ण पाटील, जालिंदर चित्ते, युवराज पाटील, योजनताई पाटील, मीना बाग, प्राचार्य सोनाली पाटील, रावण भिल, डॉ. विशाल पाटील, डॉ. विलास पाटील, गणेश परदेशी, योगेश गंजे, हर्षल पाटील, संभाजी भोसले उपस्थित होते.

ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांनी फक्त बचत गट व कर्ज एवढे मर्यादित न राहता सांस्कृतिक कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभाग घेऊन जगण्याचा निखळ आनंद लुटावा हा या महोत्सवाचा उद्देश आहे असे प्रतिपादन सभापती डॉ अर्चनाताई पाटील यांनी व्यक्त केले.

गिरणाई महोत्सवात महिलांकरीता विविध स्पर्धा रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, उखाणे स्पर्धा, मिसेस बचत गट स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पुरणपोळी, भरीत भाकरी, लिंबू लोणचे, हळद, गांडूळखत, गृहोपयोगी वस्तू यांचे विविध ३० स्टॉल लावले होते व या माध्यमातून २ लाखापेक्षा अधिक उलाढाल दिवसभरात पूर्ण झाली. उमेद अभियानात कार्यरत सर्व केडर यांचा सत्कार व ज्या महिला बचत गटांची कर्ज मागणी होती त्यांना कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी महसूल विभागतर्फे ५ निराधार महिलाना २० हजार रुपयांचे धानदेश देण्यात आले. सूत्रसंचालन सुभाष उगले व दिलीप चिंचोले यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन सभापती डॉ. अर्चना पाटील, गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ, सहा. गविअ संजय लखवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक प्रशांत महाले, प्रभाग समन्वयक प्रशांत परदेशी व सचिन महाजन यांनी अथक परिश्रम घेतले.

 

 

 

Protected Content