हे तर समीर दाऊद वानखेडे : मलिकांनी केले पहिल्या लग्नाचे फोटो व्हायरल

मुंबई प्रतिनिधी | ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणारे अधिकारी समीर वानखेडे यांनी समीर दाऊद वानखेडे या नावाने पहिले लग्न केले असल्याचा गौप्यस्फोट अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांनी केला आहे. तसेच बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. तर वानखेडे यांनी हे प्रमाणपत्र खोटे असल्याचे सांगत याबाबत दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

 

पहचान कौन असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा लग्नातील फोटो ट्वीटरवर शेअर करुन आणखी खळबळ उडवून दिली आहे.तसेच यहॉंसे शुरु हुआ फर्जीवाडा असं म्हणत दुसरं ट्वीट करत समीर दाऊद वानखेडे यांचे जातप्रमाणपत्र शेअर करुन पोलखोल केली आहे. अजून काही पुरावे नवाब मलिक समोर आणणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरण उजेडात आल्यापासून नवाब मलिक यांनी एनसीबी विशेषत: समीर वानखेडे यांना सातत्यानं लक्ष्य केलं आहे. वानखेडे हे भाजपच्या काही नेत्यांच्या सांगण्यावरून बॉलिवूडला त्रास देत असल्याचा आरोप मलिक यांनी यापूर्वीच केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. एखाद्या कारवाईच्या आधी वानखेडे हेच मीडियाला माहिती देत असतात. हव्या त्या बातम्या पेरून लोकांची बदनामी केली जाते. त्यानंतर त्यांच्याकडून वसुली केली जाते, असा आरोप मलिक यांनी केला आहे. वानखेडे यांची नोकरी घालवल्याशिवाय व त्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय थांबणार नाही, असा इशाराही मलिक यांनी दिला आहे.

दरम्यान, आज समीर वानखेडे यांच्याशी संबंधीत कागदपत्रे व्हायरल केल्यानंतर खळबळ उडालेली आहे. तर वानखेडे यांनी हा सर्व बनावट प्रकार असून आपण या प्रकरणी नवाब मलीक यांच्यावर दावा दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे.

Protected Content